गजानन गव्हाणे पाटील
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शिरूर तालुका उपाध्यक्षपदी वाजेवाडी /मांजरेवाडी ता. शिरूर येथील शुभम मांजरे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे, माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अँड. अमित मोहन गव्हाणे यांनी निवडीचे पत्र देऊन नियुक्ती करत अभिनंदन केले.
यावेळी शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, कात्रज डेअरी चे संचालक स्वप्नील ढमढेरे आदी मान्यवर व राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

उत्तम समाजिक कार्य, पक्षनिष्ठता, प्रामाणिक कार्यकर्ता, भक्कम पक्ष संघटन, मिळालेल्या पदांवर उत्तम कार्यशैलीने पदांवर यशस्वी काम या सर्व उत्तम बाबींचा विचार करून त्यांना निवड करण्यात आली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे, आचार-विचार सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशिल राहणार असल्याचे शुभम मांजरे यांनी शिरूर आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.





