गजानन गव्हाणे पाटील
सणसवाडी, ता शिरूर येथील बाबासाहेब दरेकर यांचे उत्तम सामाजिक कार्य, पक्षनिष्ठता, प्रामाणिक कार्यकर्ता, भक्कम पक्ष संघटन, मिळालेल्या पदांवर उत्तम कार्यशैली या सर्व उत्तम बाबींचा विचार करून त्यांची भारतीय जनता पार्टी प्रदेश कामगार मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व अंबादास कुरूदळे यांची अण्णापुर ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, संघटन सरचिटणीस रघुनंदन गवारे, युवा मोर्चा सरचिटणीस केशव पाचर्णे, युवा मोर्चा उपाध्यक्ष विष्णू भाऊ दरेकर, ग्रामपंचायत सदस्य सणसवाडी मोहन हरगुडे, डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे, मा.उपसरपंच सणसवाडी नवनाथ भुजबळ, अतुल साठे, विजय साठे, विद्याधर दरेकर, महादेव वाखारे, महेंद्र दरेकर, विकास घुटुकडे, अक्कूदादा दरेकर यांच्या सह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.





