गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायतीने ३२ कामगारांना दिवाळीनिमित्त बोनस म्हणून दोन पगार, मिठाई, कपडे यांसह प्रत्येक कामगारांचा पाच लाखांचा विमा उतरविल्याने कामगारांची या वर्षीची दिवाळी गोड झाल्याचे सरपंच विक्रम गव्हाणे व उपसरपंच गणेश कांबळे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या दरवर्षी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देत असते. यंदा ही डबल बोनस, मिठाई, कपडे व विमा कवचचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच गणेश कांबळे, सदस्य केशव फडतरे, सविता घावटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर, अशोक फडतरे, सागर गव्हाणे, विनोद दौंडकर, आनंदा पवार, रमेश वारघडे, मारुती ढेरंगे, समीर जाधव, देवदत्त गव्हाणे, गणेश साळवे, लहू जाधव उपस्थित होते.

यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, अमोल गव्हाणे, केशव फडतरे यांनी सर्व कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
कामगारांना दोन पगार बोनस, चालू महिन्याचा पगारासह पाच लाखांचा विमा संरक्षण दिल्याने कामगारांची आर्थिक प्रगतीबरोबरच आरोग्याची ही काळजी ग्रामपंचायत घेत असल्याने कामगारांची दिवाळी गोड होत असल्याचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगितले.





