- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमनोज जरांगे पाटील यांची रविवारी भोरमध्ये सभा

मनोज जरांगे पाटील यांची रविवारी भोरमध्ये सभा

- Advertisement -spot_img

भोर प्रतिनिधी: बाबाजी साळेकर
भोर मध्ये मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १९) मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित केली असून लाखोंच्या घरात मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याने ही सभा ऐतिहासिक होणार आहे, असा विश्वास भोर तालुका सकल मराठा संयोजकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मराठा समाजाची ऐतिहासिक विराट सभा भोर शहरातील विद्यानगरमधील शेटे माळावर १८ एकरांत आयोजित केली असून सभेच्या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. समाज बांधवांसाठी अल्पोपहार, पाणी, पार्किंग, सभा उशिरापर्यंत चालू राहिल्यास लाइटिंग तसेच दोन एलईडी लावण्याची व्यवस्था केली आहे. तालुक्यात पूर्णतः गावा-गावांमधील समाज बांधव सभेला येण्यासाठी फ्लेक्स लावून सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
सभेच्या ठिकाणी सुव्यवस्था राखण्यासाठी १५० स्वयंसेवक असून स्वागत, व्यासपीठ, आपत्कालीन, सुरक्षा, आरोग्य, नियंत्रण कक्ष समित्या नेमल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून मुस्लीम समाज पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सकल मराठा तालुकाध्यक्ष संजय भेलके यांनी सांगितले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी सचिव सारंग शेटे, सोमनाथ ढवळे, महेश शेटे, भालचंद्र मळेकर, दीपक शेटे, स्वामी धुमाळ, ओंकार शिवतरे, बाळा शेटे, एकनाथ रोमन, ॲड. धीरज चव्हाण, महेश भेलके, अमर चव्हाण आदी मराठा बांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page