- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवढू बुद्रुक येथील माहेर संस्थेत बालदिन उत्सव साजरा

वढू बुद्रुक येथील माहेर संस्थेत बालदिन उत्सव साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
माहेर संस्था वढू बु।। येथे मोठ्या उत्साहात बाल मेळावा साजरा करण्यात आला. पेरणे फाटा,आपटी,भोंडवे वस्ती, फडतरे वस्ती, आरगडे वस्ती, केंदुर, बकोरी, आव्हाळवाडी, वडगावशेरी तसेच ऊसतोडी कामगार यांची बालके सहभागी झाली होती. एकूण ३५० बालकांनी या बालमेळाव्यात सहभाग घेतला होता.


कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करुन प्रतिमेच पूजन केले.माहेरच्या मुलांनी प्रार्थना नृत्याने सादर केली. बालमेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून अँड. गणेश म्हस्के, शिवव्याख्याते शेखर पाटील, विजय बाविस्कर, राहूल बागल, बालाजी पाटील, उद्योजक प्रदिप बराल उपस्थित होते. तर माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, विश्वस्त योगेश भोर, मर्सी मिंडोसा उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे शिवव्याख्याते शेखर पाटील बोलतांना बाल शिवाजी महाराज व बाल संस्कार कसे असतात याबद्दल माहीती दिली व माहेर संस्थेच्या संस्थापिका सि. लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाखाली माहेर संस्था संस्थेतील व पंचक्रोशीतील मुलांवर उत्तम संस्कार करित आहे, असे कौतुकउद्गार काढले.
यावेळी हनिफ पुणेकर यांचे जादुचे प्रयोग बालकांसाठी सादर करण्यात आले. यावेळी मुलांसाठी विविध खेळ घेवून जेवण, विविध भेट वस्तु देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्विनी पवार यांनी केले तर सुत्रसंचालन सागर वावरे व आभार प्रदर्शन ऋषभ खडसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माहेरच्या कर्मचारी यांनी परिश्रम केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page