गजानन गव्हाणे पाटील
मांजरी खुर्द, ता.हवेली येथील सामाजिक कार्यात कार्यरत असणारे माऊली उंद्रे यांची भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्षपदी माजी आमदार जगदिश मुळीक यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजपा सरचिटणीस बाप्पु मानकर, पुणे शहराध्यक्ष करण मिसाळ यांच्यासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नवनिर्वाचित माऊली उंद्रे यांची निवड झाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
भारतीय जनता पक्षात आलो आणि जीवनाची दिशाच बदलली सुरवातीला संघ स्वयंसेवक म्हणून सामाजिक कामात हाथ घातला नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीने राजकारनाचे आकर्षण वाढले. माझे मार्गदर्शक रोहिदास शेठ उंद्रे पाटील, माझा भाऊ स्वप्नील काका उंद्रे पाटील यांच्या सोबत राहून गावातील उपसरपंच पद मिळून गावाची सेवा करण्याचे भाग्य लाभले. मागच्या काहीं वर्षात आमचे माजी आमदार जगदीश भाऊ मुळीक व मार्गदर्शक योगेश अण्णा टिळेकर व ज्यांच्या नेतृत्वात गेल्या ४ वर्षात मी व माझ्या सहकार्यांनी युवा मोर्चाचे नेतृत्व करीत पुणे शहर अक्षरशः हादरून सोडले असे माझे मार्गदर्शक बंधू बाप्पू मानकर व करण सतीश मिसाळ यांनी माझ्या वर जो पुणे शहर उपाध्याक्ष म्हणून जो विश्वास दाखवून नवीन जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी राहील.

आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे तो खरा उतरण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास दाखवतो व भारतीय जनता पक्षाची विचारधारा मूल्य संस्कार अधिक जोमाने पणे शहरात रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित शहर उपाध्यक्ष माऊली उंद्रे यांनी ” आपली लोकशाही ” शी बोलताना सांगितले





