- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणदिवाळीचा पहिला दिवा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी

दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शौर्यपीठ तुळापूर येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी सालाबादप्रमाणे स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्मारकाचे पूजन करून भव्य दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
हा सोहळा शेकडो शिवशंभू प्रेमिंनी शिवमय वातावरणात राजेंचा जय घोषणात मंगलमय वातावरण व दिव्यांची रोषणाई करून साजरा केला. यावेळी ऋषिकेश ताकवले यांनी मर्दानी खेळाचे आयोजन केले.
या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांचे वंशज,सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज आकाश कंक, शंभु राजांच्या दूध आई वीरमाता धाराऊ गाडे यांचे वंशज बाबुराजे गाडे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सुपा परगणा प्रमुख सुनील राजे भोसले, पिलाजी शिर्के यांचे वंशज अमितराजे राजेशिर्के, म्हाळोजी बाबा घोरपडे यांचे वंशज इंद्रजितसिंह, घोरपडे, जोगवडी संस्थानचे ऋषिकेश राजे भोसले, अलकाताई राजे भोसले, मीना काकी सातव पाटील, ज्योती सातव, मिरा शिंदे, सुजाता काकी सातव, दर्शना पठारे, प्रतिभा भालेकर, नेहा ताकवले, ज्योती थोरात, पुनम तावरे, अलका सोनवणे, पुनम आव्हाळे, पोपट आव्हाळे, भानुदास आव्हाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सत्कार मूर्ती म्हणून अँड गणेश मस्के, दीपक नायक, संदीप कंबीलकर, संदेश आव्हाळे, शेखर पाटील, नितीन भालेकर, अँड संजय सावंत, सुष्मा आव्हाळे आदींचा यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
अतुल बनकर यांनी सुत्रसंचालन तर संस्थेच्या अध्यक्षा सौ. कामिनी राजे भोसले जहागीरदार ताकवले यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page