शिक्रापूर प्रतिनीधी : विनायक साबळे
पत्रकार हे सर्व घटनाकांना न्याय देण्यासाठी कोणत्याही सुरखे विना अहोरात्र झटत असतात, मात्र पत्रकारांना त्यांच्या संरक्षणासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन विमाकवच देणार असल्याचे प्रतिपादन शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी केले आहे.


शिक्रापूर, ता. शिरुर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच रमेश गडदे यांच्या वैयक्तिक निधीतून पत्रकारांना दिवाळी निमित्ताने मिठाई वाटप कार्यक्रमात सरपंच रमेश गडदे बोलत होते.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, ग्रंथपाल संतोष काळे, पत्रकार बंधू, ग्रामपंचायत कर्मचारी विलास पवार, गणेश गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पत्रकार समाजासाठी अहोरात्र काम करत असताना पत्रकार हे दुर्लक्षित राहत असून समाजाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, प्रास्ताविक त्रिनयन कळमकर यांनी तर ग्रंथपाल संतोष काळे यांनी आभार मानले.





