- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबापटांच्या वाजेवाडीत अशोक पवारांची बाजी : पुनम चौधरी मोठ्या मताधिक्याने झाल्या सरपंच

बापटांच्या वाजेवाडीत अशोक पवारांची बाजी : पुनम चौधरी मोठ्या मताधिक्याने झाल्या सरपंच

- Advertisement -spot_img

आदर्श सरपंच धर्मराज वाजे यांच्या चाणक्य नीतीचे सर्वत्र कौतुक
गजानन गव्हाणे पाटील
दिवंगत माजी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मोठ्या आवडीने आमदार आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या वाजेवाडी (ता.शिरूर) येथील लोकनियुक्त सरपंच निवडणूकीत आमदार अशोक पवार यांच्या उमेदवार पुनम ज्ञानेश्वर चौधरी यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. विशेष म्हणजे एकुण नऊ जागांपैकी पाच जागा निवडणूकीपूर्वीच बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित चार जागांसाठीच्या निवडणूकीत विरोधकांनी तीन जागांवर बाजी मारली.


वाजेवाडी, ता.शिरूर या गावातील स्वीय सहायक असलेले अमित सोनवणे यांचेमुळे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत गिरीश बापट यांनी सन २०१५ मध्ये आमदार आदर्शग्राम योजनेत दत्तक घेतले व १२ ते १५ कोटींची विकासकामेही त्यांनी केली. पर्यायाने बापटांना माननारा मोठा वर्ग या गावात असल्याने त्यांच्याच विचाराचा प्रभाव गावावर राहील अशी स्थिती होती. प्रत्यक्षात संपूर्ण ९ सदस्यांसह लोकनियुक्त सरपंच बिनविरोध करण्याचे प्रयत्न मर्यादित यशस्वी होत सुरज तिखे, औदुंबर भोंडवे, रामदास मांजरे, सौ.श्वेता भानुदास मांजरे, सौ.सुरेखा रमेश मांजरे आदी पाच सदस्य बिनविरोध झाले.


उर्वरित चार सदस्य व सरपंचपदासाठीची निवडणूक पद्मावतीमाता प्रगती पॅनल व पद्मावतीमाता ग्रामविकास पॅनलमध्ये निवडणूक पार पडली. सरपंचपदासाठी पुनम ज्ञानेश्वर चौधरी व प्राजक्ता हिंमत वाजे यांच्यात सरळ-सरळ लढत झाली. यात तब्बल १६४ मतांनी पुनम चौधरी यांनी बाजी मारली. इतर सदस्यांमध्ये संदीप भोर, मंगल तिखे, यशोदा सोनवणे हे श्रीपद्मावतीमाता प्रगती पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले तर चैताली वाजे या श्रीपद्मावतीमाता ग्रामविकास पॅनलकडून विजयी झाल्या.


श्रीपद्मावती माता प्रगती पॅनलच्या पराभूत सरपंचपदाच्या उमेदवार प्राजक्ता हिंमत वाजे या पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष भगवानराव शेळके यांच्या भाचेसुन असल्याने या लढतीकडे तालुक्याचे लक्ष होते. या पॅनलच्या पाठीशी दिवंगत पालकमंत्री गिरीश बापट यांचे तत्कालीन स्वीय सहायक तथा माजी उपसरपंच अमित सोनवणे, माजी सरपंच रंगनाथ आबा वाजे, भरत भोंडवे, प्रा. नानासाहेब वाजे, अनिल वाजे आदींनी आपली ताकद पणाला लावली होती तर विजयी सरपंच पुनम ज्ञानेश्वर चौधरी यांच्या विजयाचे किंगमेकर राहिले ते आमदार अशोक पवार कट्टर समर्थक आदर्श सरपंच धर्मराज वाजे.
याशिवाय पॅनल प्रमुख गणेश वाजे, शिवाजी भोंडवे, अ‍ॅड.आप्पासहेब वाजे, संतोष मांजरे, राज मांजरे, नितीन वाजे, अशोक वाजे, विशाल वाजे, सचिन वाजे, किसन वाजे, पप्पू वाजे, हरीश वाजे आदींनी ही निवडणूक विशेष प्रतिष्ठेची केल्याने तालुक्यात या निकालांची उत्सूकता होती. दरम्यान विजयी सरपंच पुनम चौधरींसह सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आमदार अशोक पवार, माजी सभापती प्रकाश पवार, माजी उपसभापती सविता प-हाड यांनी केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

वाजेवाडी आमदार अशोक पवारांची हे दाखवून दिले
वाजेवाडी ही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आमदार अशोक पवार यांना माननारी असल्याचे आम्ही या निकालाने दाखवून दिले. विशेष म्हणजे राजकारण व सत्तेसाठी भाजपा बरोबर तडजोड करण्याचे आम्ही टाळल्याने आम्हाला एवढे मोठे यश मिळाले.
धर्मराज वाजे (माजी सरपंच, वाजेवाडी)

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page