गजानन गव्हाणे पाटील
कष्टाशिवाय प्रगती नाही, देशामध्ये सोन्याची मागणी मोठी आहे गुणवत्ता राखली तर यश नक्कीच मिळेल तसेच ग्राहकांच्या विश्वासाला पात्र बनून व्यवसाय करा असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांनी केले.
कोरेगांव भिमा, ता. शिरूर येथे धनलक्ष्मी ज्वेलर्स या नवीन दालनाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार बोलत होते.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पी. के. आण्णा गव्हाणे, घोडगांगा कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव ढेरंगे, माजी सरपंच बाळासाहेब फडतरे, विजय गव्हाणे, संदीप ढेरंगे, अशोक काशीद, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, राजाराम ढेरंगे, अंकुश साबळे, माजी चेअरमन महादेव फडतरे, बबुशा ढेरंगे, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे व खरेदी विक्री संघाचे संचालक अशोक काका गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, मनीषा गव्हाणे, तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष बबनराव गव्हाणे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, हॉलीबॉल चे शिरूर तालुकाध्यक्ष आनंदराव फडतरे, माजी ग्रामपंचायत तुळशीदास फडतरे, उद्योजक किरण कुलकर्णी, सुनील ढेरंगे, विक्रम दौंडकर, निखिल फडतरे, दीपक फडतरे, माजी संचालक नितीन गव्हाणे, रविंद्र भंडारी, अशोक ढेरंगे, सागर घावटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत धनलक्ष्मी ज्वेलर्स चे मालक दिलीप सोनी, चंद्र शेखर सोनी, पूनम सोनी यांनी केले.
सूत्रसंचालन रविंद्र फडतरे यांनी केले तर आभार तुळशीदास फडतरे यांनी मानले.





