गजानन गव्हाणे पाटील
अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या वाडा पुनर्वसन, ता. शिरूर येथील प्रभाग १ मध्ये पोट निवडणुक अखेर गीता अनमोल पंजाबी यांनी ८६ मते मिळवीत मेघना प्रमोद माळी यांचा अवघ्या १२ मतांनी पराभव केला मेघना माळी यांना ७४ मते मिळाली होती.

सुरेखा बाळासाहेब ढोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रभाग क्रमांक १ मध्ये एकूण १७० मतदान होते. त्यातील १६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

गीता पंजाबी यांच्या निवडणुकीच्या विजयासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष मोहन माळी, उपसरपंच संपत माळी, माजी उपसरपंच स्वाती परशुराम माळी, माजी सरपंच वसंत भोकटे, उज्वला पवार, सचिन माळी, राजाभाऊ हत्ते, माजी व्हा. चेअरमन प्रकाश माळी, माजी सरपंच सुषमा माळी, नवनाथ माळी, गणेश माळी, कृष्णा माळी, दिलीप माळी, राजेश माळी, संदेश माळी, बाळासाहेब सावंत, अनिकेत कोबल, बाळासाहेब भोकरे, माजी सरपंच इरफान तांबोळी, काशिनाथ शिंगे, राहुल चव्हाण, शुभम उत्तेकर, बापू भांडवलकर, स्वप्नील भोकरे, माजी उपसरपंच सतीश पवार, सूरज पंजाबी आदींनी परिश्रम घेतले.

गावातील विकास कामांना गती देण्या बरोबर रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार असून महिला बचत गट, बंदिस्त गटार योजना यांचा पाठवपुरावा करेल असा विश्वास यावेळी आपल्या सन्मानाला उत्तर देताना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या गीता पंजाबी यांनी व्यक्त केला. तसेच जे लोक माझ्या पाठीशी खंबीर पणें उभे राहिले त्यांचे आभार त्यांनी मानले.
या प्रसंगी पंजाबी यांचा पंचक्रोशीतील पदाधिकारी यांचे वतीने निवडी बद्दल सन्मान करण्यात आला.





