- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुमिता गव्हाणे तर उपाध्यक्ष पदी गणेश गव्हाणे

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुमिता गव्हाणे तर उपाध्यक्ष पदी गणेश गव्हाणे

- Advertisement -spot_img

कोरेगांव भिमा : प्रतिनीधी
कोरेगांव भिमा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेला संधी मिळाली असून सुमीता विनायक गव्हाणे यांना पहिल्या महिला अध्यक्ष पदी तर गणेश पोपट गव्हाणे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम बांदल यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.
संपूर्ण निवड प्रक्रिया अत्यंत शांत पद्धतीने पार पडली. यावेळी एका वर्गाची निवडणूक वगळता बाकी सर्व प्रतिनिधी बिनविरोध निवडण्यात आले. यावेळी अध्यक्षपदी सुमिता विनायक गव्हाणे, उपाध्यक्ष गणेश पोपट गव्हाणे, सारिका संपत भांडवलकर, शालिका महादेव जाधव, पूनम महेश लांडगे, संध्या गणेश कुंभार, मारुती ज्ञानोबा पिंपळपिल्ले, सागर सोपान घावटे, सोनाली युवराज मसलखांब, उषा विष्णू भारती, मनीषा गजानन तापकीर, ग्रामपंचायत प्रतिनिधी मनीषा संपत गव्हाणे, शिक्षक तज्ञ गजानन बाळासाहेब गव्हाणे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, उपसरपंच गणेश कांबळे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा गव्हाणे, कोमल खलसे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नागेश गव्हाणे, उद्योजक विनायक गव्हाणे आदी मान्यवर, पालक यावेळी उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मावळते अध्यक्ष यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन तुकाराम सातकर यांनी तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम बांदल यांनी मानले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page