शिक्रापूर प्रतिनीधी : विनायक साबळे
कोरेगांव भिमा येथील कांद्याचे व्यापारी आणि महात्मा गांधी तंटमुक्ती समितीचे माजी उपाध्यक्ष विजय साहेबराव गव्हाणे यांनी वाढदिवसाला होणाऱ्या खर्चाला फाटा देत येथील बाजार मैदानातील मारुती मंदिराला लाईट बोर्ड देत आगळा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
यावेळी जय हनुमान सेवा मंडळाचे बबनराव गव्हाणे, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सोनवणे, माजी सरपंच बाळासाहेब फडतरे, कोरेगांव भिमा विविध कार्यकारी विकास सोसायटी क्रमांक २ चे सचिव मधुकर कंद, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब गव्हाणे, रामदास गव्हाणे, सुनील नानगुडे,लक्ष्मण गव्हाणे, दत्तात्रय फडतरे, महिला तसेच सिध्देश्वर भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विजय गव्हाणे यांच्या हस्ते मारुतीचे विधिवत पूजन करत आरती करण्यात आली.





