गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये गावातील ओढा-नाला खोलीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या ओढा खोलीकरणाने गावातील पाणीसाठ्याचे प्रमाण वाढेल त्याचा फायदा पूर्ण गावातील नागरीकांना होईल तसेच नैसर्गिक जलस्रोत बळकट करण्यासाठी अनेक वर्षांपासून ओढ्यात साचलेला गाळ उपसा करून पाणीसाठा वाढविण्यासाठी ओढा खोलीकरण कामाची सुरुवात करण्यात आली.

ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी व खोलीकरणाचे
काम प्रभावीपणे ग्रामपंचायतकडून जवळपास ४ लाख १ हजार रुपयांचा निधी ओढा खोलीकरणाच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ओढा खोलीकरण व नाला खोलीकरणाच्या माध्यमातून नैसर्गिक जलस्रोत बळकट केल्यामुळे त्याचा भविष्य काळात चांगला फायदा टंचाई निवारणासाठी होणार आहे.





