- Advertisement -spot_img
Homeक्राईमब्रेकिंग : कोरेगांव भिमा नदी पात्रात एकाची उडी मारून आत्महत्या

ब्रेकिंग : कोरेगांव भिमा नदी पात्रात एकाची उडी मारून आत्महत्या

- Advertisement -spot_img

शिक्रापूर प्रतिनिधी : विनायक साबळे
कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथे भीमा नदी पात्रामध्ये आज सकाळी एक मृतदेह आढळला असून सदर व्यक्तीला शिक्रापूर पोलिसांनी पोलीस मित्रांच्या मदतीने नदीपात्रातून बाहेर काढून पुढील कार्यवाही साठी शिक्रापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु भिमा नदी पात्रात मृतदेह असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नदीपात्रात व भिमा नदीच्या पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

या संदर्भात शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भिमा नदीच्या पात्रात सकाळच्या वेळी पाण्यामध्ये एक मृतदेह तरंगताना दिसला यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक पंडित मांजरे, पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस मित्र खंडू चकोर, स्वप्नील भोकरे यांच्या मदतीने सदर व्यक्तीला पाण्याबाहेर काढण्यात आले. यावेळी सदर व्यक्तीचे नाव बापूराव बेलाजी साळवे (वय ५० वर्षे, रा. लोणीकंद, ता. हवेली) असल्याचे समजले. या बाबत मृताची पत्नी सुमन बापूराव साळवे (वय ३८ वर्षे) यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. की, बापूराव यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा होता त्याचा मृत्यू काल दि. २५ रोजी मामाच्या घरी झाला होता.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांनी भेट देत सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार सचिन मोरे करत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page