- Advertisement -spot_img
Homeक्राईमकॉलेज परिसरातील हॉस्टेलमधून पहाटे लॅपटॉप चोरून नेणाऱ्या सराईत तरुणास लोणीकंद पोलिसांनी केले...

कॉलेज परिसरातील हॉस्टेलमधून पहाटे लॅपटॉप चोरून नेणाऱ्या सराईत तरुणास लोणीकंद पोलिसांनी केले जेरबंद

- Advertisement -spot_img

वाघोली येथे सापळा रचून केली अटक ; २७ लॅपटॉप, १ टॅब, १ मोबाईल केले जप्त ; १८ गुन्हे उघडकीस
पुणे : प्रतिनीधी
कॉलेज परिसरातील हॉस्टेलमध्ये पहाटेच्या सुमारास उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून लॅपटॉप, मोबाईल चोरून नेणाऱ्या तरुणास लोणीकंद पोलिसांच्या पथकाने वाघोलीतील रायसोनी कॉलेज समोर सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी चिंचवड परिसरात दाखल १८ चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून २७ लॅपटॉप, १ टॅब, १ मोबाईल असा एकूण १० लाख ८० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. निलेश प्रफुलचंद कर्नावट (वय ३९, रा. नांद्रा, पाचोरा जळगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायसोनी कॉलेज परिसरामध्ये असणाऱ्या हॉस्टेलमध्ये पहाटेच्या सुमारास उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून लॅपटॉप चोरून नेत असल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत लोणीकंद पोलिसांनी दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना सीसीटीव्ही तपासून गुन्ह्यांच्या पद्धतीचा अभ्यास केला. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला असता रायसोनी कॉलेजच्या मुख्य गेट समोर उभ्या असलेल्या निलेश कर्नावट यास पोलिसांनी ताब्यात घेतले. लॅपटॉप चोरी झालेल्या घटनास्थळाचे ठिकाणावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला तरुण आणि ताब्यात घेतलेला तरुण एकच असल्याचे समजले. अधिक तपासामध्ये त्याने रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बायोसीस कॉलेज, एमआयटी कॉलेज परिसरातून तसेच वारजे माळवाडी, देहू, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातून लॅपटॉप चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.
त्याच्याकडून २७ लॅपटॉप, १ टॅब, १ मोबाईल असा एकूण १० लाख ८० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. लोणीकंद (४), वारजेमाळवाडी (५), दिघी (२), भारती विद्यापीठ (२) तर लोणावळा, पौड, बिबवेवाडी, वानवडी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एकूण १८ गुन्हे उघडकीस आले आहेत. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
निलेश कर्नावट सराईत असून त्याच्यावर २००८ ते २०२२ दरम्यान अगोदरच २१ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. नोव्हेंबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान वारजे येथील गुन्ह्यामध्ये तो तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा लॅपटॉप व इतर साहित्य चोरीचे आणखी १८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त साो, येरवडा विभाग, संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीक ंद पोलीस ठाणे मारुती पाटील यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सपोनि गजानन जाधव, रविंद्र गोडसे, बाळासाहेब सकाटे, पोलीस हवालदार संदीप तिकोणे, पोलीस नाईक अजित फरांदे, सागर जगताप, विनायक साळवे, स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, अमोल ढोणे, आशिष लोहार, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, साई रोकडे, दिपक कोकरे, शुभम चिनके, सचिन चव्हाण यांनी केली.
—–:::    चोरीच्या घटना टाळण्यासाठी पहाटे दरवाजा आतून बंद करा :::—-
वाघोलीतील कॉलेज परिसरात असणाऱ्या हॉस्टेल व इतर इमारतींमध्ये पहाटेच्या सुमारास उघड्या दरवाजावाटे लॅपटॉप, मोबाईल चोरून नेल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. रूममधील एखादा व्यक्ती कामानिमित्त किंवा कॉलेजसाठी सकाळी बाहेर निघत असताना बाहेरून कडी लावतो किंवा दरवाजा फक्त बंद करून निघून जातो. याचाच फायदा चोरटे घेतात आणि उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करून साहित्य लंपास केले जाते. पहाटेच्या साखरझोपेमध्ये असलेल्या व्यक्तींना साहित्य चोरून नेल्याचे कळतही नाही. त्यामुळे रूममधील व्यक्तींनी चोरीची घटना टाळण्यासाठी आतमधून कडी लावून दरवाजा बंद करणे गरजेचे आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page