- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणवाघोली डॉक्टर्स असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्कार डॉ चंद्रकांत कोलते यांना प्रदान

वाघोली डॉक्टर्स असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्कार डॉ चंद्रकांत कोलते यांना प्रदान

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. चंद्रकांत कोलते यांना वाघोली डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने दांडिया सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त वाघोली येथील सिझन्स बँक्वेट हॉलमध्ये वाघोली डॉक्टर्स असोसिएशन प्रथम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास असोसिएशनचे संस्थापक डॉ. विनोद सातव, अध्यक्ष डॉ. भूषण विधाते, सचिव डॉ. मच्छिंद्र काशीद, खजिनदार डॉ. नितीन पवार यांच्या हस्ते डॉ कोलते यांना पुणेरी पगडी घालून मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे डॉ. बाळासाहेब हरपळे, डॉ. स्मिता कोलते, महिला कार्यकारिणी सदस्य डॉ. पल्लवी मेहेरे, डॉ. वैशाली जायकर, डॉ. सायली भुजबळ, डॉ. दाफिया चिंचाणीकर, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. रुचा कोलते, डॉ. ज्योती जाधव व सर्वच सदस्यांनी स्वागत व कौतुक केले.
कार्यक्रमास वाघोली डॉक्टर्स असोसिएशनचे 200 सदस्य उपस्थित राहून गौरव पुरस्कार व दांडिया कार्यक्रम सुद्धा खूप मोठ्या थाटामाटात, आनंद व उत्साहात पार पडला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page