- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणउमेश भंडारे यांना विशेष गौरव पुरस्कार जाहीर

उमेश भंडारे यांना विशेष गौरव पुरस्कार जाहीर

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल शिरूर तालुक्यातील वढु बुद्रुक येथील मातोश्री उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक उमेश महादेव भंडारे यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्था शिरूर हवेली यांच्या वतीने समाजसेवा या विभागातील विशेष गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना कोरेगांव भिमा येथील एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.


मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांत उमेश भंडारे यांचा सिंहाचा वाटा आहे. शरदचंद्रजी पवार विद्यालयात शिक्षकांचा गुणगौरव समारंभ असो वा कोरोना काळात असंख्य नागरिकांना मातोश्री उद्योग समूहाचे वतीने अन्न धान्य वाटप करण्यात आले. नुकतेच त्यांच्या माध्यमातून वढु बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयात विद्यार्थी, पालक यांच्यासाठी प्रबोधनपर वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तर वढु बुद्रुक रस्त्यावर सिमेंट काँक्रिट चे आधी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यावेळी या भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार वर्ग व छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या शंभू भक्तांसाठी स्व खर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

तसेच ग्रामीण भागातील युवा क्रिकेट खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेट ची दारे उघडली जावीत यासाठी केंदुर – पाबल तसेच सणसवाडी – तळेगाव जिल्हा परिषद गटातील खेळाडूंसाठी धर्मवीर शंभूराजे प्रीमियम लीगचे अनेक वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे
याच कार्याची दखल घेत त्यांना सामाजिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page