- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भीमा येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

कोरेगाव भीमा येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, तालुका शिरूर येथील शेतकऱ्यावर बिबट्याने पठार वस्ती येथे उसाच्या शेतामध्ये पाणी बारे बदलताना अचानक प्राणघातक हल्ला केला, आनंदा किसन फडतरे वय ४७ असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बिबट्याने केलेल्या या अचानक हल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने पावले उचलून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांचे कडून करण्यात येत आहे.


सायंकाळच्या सुमारास फडतरे हे आपल्या शेतामध्ये उसावर पाणी लावण्यासाठी बारे बदलत असताना उसाच्या सरीत उभा असणाऱ्या बिबट्याने फडतरे यांच्यावर अचानक उडी मारून झडप घातली, वाढलेल्या उसामध्ये बिबट्या दिसला नसल्याने, तसेच अचानक हल्ला झाल्याने शेतकरी फडतरे खूप घाबरून गेले, यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून बिबट्याचा दात त्यांच्या वरच्या ओठांमध्ये, हाताच्या अंगठ्यामध्ये घुसला असून, बिबट्याने आपल्या पंज्याने फडतरे यांच्या तोंडाला, डोक्याला, हाताला, पायाला, दंडाला गंभीर दुखापत केली आहे.
या हल्ल्यानंतर फडतरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी धनंजय फडतरे व शहाजी फडतरे यांनी धाव घेतली, दरम्यानच्या काळात बिबट्या हल्ला करून समोर उसाच्या सरीत उभा पाहत होता, यावेळी आनंदा फडतरे यांनी बारे बदलण्यासाठी आणलेले खोरे उचलले व बिबट्याच्या दिशेने उगारले असता बिबट्या शांत उभा राहिला त्यानंतर आनंदा फडतरे यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. यावेळी वनविभाग शिरूर चे अधिकारी व कर्मचारी यांनी फडतरे यांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच तक्रार दाखल करून लसीकरण उपलब्ध करून दिले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून या भागामध्ये बिबट्याच्या अस्तित्व अनेक दिवसांपासून आहे. यापुढे अशा काही घटना घडू नये म्हणून शिरूर वनविभागाने तातडीने घटनास्थळी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. हल्याचे नंतर ही सायंकाळच्या वेळी बिबट्या अनेक शेतकऱ्यांना दिसला असून अनेकांनी त्याचे मोबाईल वर चित्रीकरण केले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page