- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसन्मान नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा... महागणपती च्या सानिध्यात

सन्मान नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा… महागणपती च्या सानिध्यात

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस पाटलांचा अभिनंदन व सत्काराचा कार्यक्रम पार पडला. श्री महागणपती देवस्थान ट्रस्ट व पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या वतीने शिरूर तालुक्यातील नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचा सत्कार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी श्री महागणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव डॉ. तुषार पाचुंदकर पाटील, पुणे जिल्हा महिला आघाडीचे अध्यक्षा हर्षदा संकपाळ, पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण काळे पाटील, कोंढापुरी चे पोलीस पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड पाटील, पुणे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख जयसिंग भंडारे पाटील, सरपंच भोगावडे पाटील, केंदूरचे माजी पोलीस पाटील सुभाष साकोरे पाटील व इतर मान्यवर पोलीस पाटील उपस्थित होते.
या सत्कारावेळी नवीन पोलीस पाटलांचा देवस्थानच्या वतीने फेटा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सर्वांच्या शुभहस्ते यावेळी श्री महागणपती ची आरती करण्यात आली. मागील आठवड्यामध्ये शिरूर तालुक्यातील २३ गावातील पोलीस पाटलांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावेळी सतरा पोलीस पाटील यांच्या नियुक्ती मा. उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी सर्वात जास्त गुण घेणाऱ्या पोलीस पाटलांची नियुक्ती जाहीर केली होती.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यामध्ये अतिशय चांगले गुण प्राप्त करून पोलीस पाटलांनी यश संपादन केले. ग्रामीण भागामध्ये अतिशय सन्मानाचे असे पोलीस पाटील पद आपल्या कष्टाने खेचून आणले. अशांचा सन्मान यावेळी करण्यात आला. पोलीस पाटलांना आगामी काळामध्ये आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी बोलताना मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी श्री महागणपती देवस्थान ट्रस्टचे सचिव रांजणगाव गणपतीचे उद्योगपती डॉ. तुषार पाचुंदकर, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे कार्यक्षम उपाध्यक्ष युवा उद्योजक किरण काळे पाटील व पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे प्रसिद्ध प्रमुख जयसिंग भंडार पाटील यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न करून हा कार्यक्रम सफल होण्यासाठी प्रयत्न केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page