- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणचांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात श्रध्दा ढवण यांचे व्याख्यान

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात श्रध्दा ढवण यांचे व्याख्यान

- Advertisement -spot_img

शिरुर : प्रतिनीधी
अभ्यासू व व्यावसायिक पध्दतीने दुग्धव्यवसाय करावा व जास्तीजास्त जणानी दुग्ध व्यवसायात यावे असे युवा उद्योजिका श्रध्दा ढवण यांनी केले.
शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात विद्यार्थिनी मंच व महिला लैंगिक अत्याचार निवारण समिती यांच्या वतीने ‘ सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा ‘ ही विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.


यावेळी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य शिरीष बरमेचा, प्रा. डॉ. पी. एस. वीरकर, महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा. पल्लवी ताठे, शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड. प्रदीप बारवकर, विजया टेमगिरे आदी उपस्थित होते.
ढवण यांचे ‘ शेण उचलाया सुध्दा अनुभव लागतो ‘ या विषयांवर व्याख्यान झाले. श्रद्धा ढवण या युवा उद्योजिका असून दुग्ध व्यवसायामध्ये अगदी शून्यातून सुरुवात करून त्या यशस्वी दुग्ध व्यवसाय करत आहे. त्यांच्या ८० म्हशींचा गोठा असून त्या स्वंत : व्यवस्थापन करतात. श्रद्धा सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रभागी आहेत. चला माती वाचवूया या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर १० हजार शेतकऱ्यांबरोबर त्या काम करत आहेत. शेतकऱ्यांनी कमीत कमी खर्चा मध्ये स्वतःच्या शेतीसाठी लागणारी जैविक खते, औषधे कशी तयार करावीत याचे प्रशिक्षण वर्ग त्या घेतात. त्याचबरोबर एकत्रित शेती याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं काम करतात.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

ढवण म्हणाल्या की आपल्याला कोणत्याही कामाला अनुभव लागतो असे सांगत आपल्या व्यवसायाची वाटचाल त्यांनी मांडली. लहानपाणापासुनच दुग्धव्यवसाया संदर्भातील छोटी मोठी कामे करायचे .सायकल वरुन मोटारसायकल व पिकअप यादवारे दुध डेअरीला पोहोचवायचे . जे काम केले ते प्रामाणिकपणे केले. कोणत्याना कोणत्या कामात स्वंत :ला गुंतवून घ्यावे असे ही त्या म्हणाल्या .८ म्हशी पासुन काम सुरु करीत ८० म्हशीचा गोठा करीत व्यवसाय वाढविला. बायोगॅस पासून वीजेची निर्मीती करतो .त्याच बरोबर गांडुळ खताची निर्मिती करत असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासु व व्यावसायिक पध्दतीने दुग्धव्यवसाय करणे आवश्यक आहे .
प्रत्येकाविषयी सकारात्मक विचार करा.
अपेक्षा या स्वंत :कडुन ठेवा इतरांकडुन ठेवु नका .तुम्ही कोण्या बरोबर राहाता त्यावरुन तुमचे विचार घडत असतात.प्रत्येकाकडुन शिकत राहा. दुधातील भेसळीवर ही त्यांनी भाष्य केले. आज किती जण शेतीकडे जायला तयार आहेत असा प्रश्न विचारुन शेती करताना अभ्यासपुर्व व नियोजन पध्दतीने करा शेती बरोबर दुग्ध व्यवसाय अन्य जोडधंदे करा आपल्या कामाचा रोडमॅप तयार करावा.
यावेळी शिरीष बरमेचा म्हणाले की शेतकरांनी स्वंत : च्या कुटुंबासाठी का होईना सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला पिकवावा. डॉ. पी. एस .वीरकर यांचे ही मनोगत यावेळी झाले.
प्रास्ताविक विद्यार्थिनी मंचच्या समन्वयक प्रा. डॉ. क्रांती पैठणकर(गोसावी) यांनी केले प्रा. पल्लवी ताठे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page