- Advertisement -spot_img
Homeशालेयभारताच्या जडणघडणीत विज्ञानाचं महत्व अधोरेखित : विश्वजित काईंगडे

भारताच्या जडणघडणीत विज्ञानाचं महत्व अधोरेखित : विश्वजित काईंगडे

- Advertisement -spot_img

न्यू टाईम्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
गजानन गव्हाणे पाटील
स्वतंत्र्योत्तर काळात विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या नियोजनबद्ध वापरामुळे आपल्या देशाची सामाजिक व आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी झाली असून भारत देशाच्या जडणघडणीत विज्ञानाचं योगदान व महत्व अधोरेखित झाल्याचे गौरवोद्गार लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन मारूती भुमकर होते.
नुकत्याच झालेल्या चांद्रयान मोहीमेच्या पार्श्वभूमीवर लोणीकंद, ता.हवेली येथील श्री रामचंद्र शिक्षण संस्था संचलित न्यू टाईम्स इंटरनॅशनल स्कूल व विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या रितीका नायडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचं महत्त्व किती आहे याचा उलगडा करीत विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेण्याचे आवाहनदेखील केले.


या विज्ञान प्रदर्शनाची पाहणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे,पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे,श्री रामचंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन मारुती भूमकर, मराठी पत्रकार संघाचे शरद पाबळे, प्राचार्या रितीका नायडू यांनी मिळून केली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चंद्रयान मोहीम, जागतिक तापमान वाढ, सौर उर्जा, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, उर्जेचे प्रकार, प्राण्यांचे निवासस्थान, इस्रो, हरितउर्जा, प्रिंटरचे मुल्यांकन आदी अनेक विषयांवर वैज्ञानिक साहित्य व प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चिकित्सक भाव उमटून आल्याचे चित्र होते. यावेळी या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत त्यांच्या उत्सहा पाहायला मिळाला.
सुत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन सहशिक्षिका प्रियांका पुरी यांनी केले.
शालेय जीवनात विद्यार्थी व शिक्षकांनी जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून समाजाच्या विकासासाठी नवी पिढी उभी करावी. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यालयात कायम नवनवीन उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक जडणघडण करण्याचा प्रयत्न विद्यालयाच्या वतीने केला जात असून याकामी संस्था अध्यक्ष मारुती भुमकर साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन असते. : प्राचार्या रितीका नायडू, न्यू टाईम्स इंटरनॅशनल स्कूल, लोणीकंद

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

आई,वडिलांनाच्या विश्वासाला सार्थ ठरवून विद्यार्थ्यांनी उत्तम अभ्यास करून योग्य कला,कौशल्य दाखवून यश संपादन केले पाहिजेत. विद्यार्थी दशेत ऊर्जा भरपूर असते.तिचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले वेळापत्रक बनवून वेळापत्रकानुसार अभ्यास, खेळ सर्व काही केले पाहिजेत. ज्यांचे वेळापत्रक चांगले आहे ते विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतात. आमच्या स्कुलचे विद्यार्थी चांगले यश मिळवीत यशस्वी होऊन आपले करिअर घडवीत आहे. : मारुती (बापू) भूमकर संस्थापक- श्री रामचंद्र शिक्षण संस्था,लोणीकंद

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page