गजानन गव्हाणे पाटील
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान व कोरेगांव भिमा ग्रामस्थांच्या माध्यमातुन ” दुर्गा माता की जय ” ” जय जिजाऊ जय शिवराय ” च्या जयघोषात कोरेगांव भिमा येथे आज दुर्गादौड चा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी असंख्य युवक, युवती व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पहिल्या दिवशीच्या दुर्गादौड निमित्ताने आरती चा मान आदर्श चौकातील गणपती मंदिराला मिळाला यावेळी महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी धर्मवीर चौक, गव्हाणे तालीम, अचानक चौक, अष्टविनायक चौक, आदर्श चौक, दोस्ती चौक असा पहिला दिवशीचा मार्ग असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.


दुर्गादौड चे मार्गावरील प्रत्येक चौकात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तर ध्वज धारकाचे औषण करण्यात आले. यावेळी ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र, देशभक्ती पर गीते, देवीची गीते गाण्यात आली. सर्वांनी डोक्यावर गांधी टोपी घालत नागरिकांनी या दुर्गदौडेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
आदर्श चौकात आरती असल्याने आदर्श प्रतिष्ठान च्या स्वयसेवकांनी चौकात फुलांच्या पायघड्या, मध्यभागी भगवा ध्वज तर आकर्षक रांगोळी काढत फटाक्यांच्या आतिषबाजीत सर्वांचे स्वागत करण्यात आले.





