गजानन गव्हाणे पाटील
कोरेगांव भिमा व पंचक्रोशीत भाद्रपद पोळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी आपल्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांची गावातून मोठ्या उत्साहात भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली.


बैलगाडा शर्यती सुरु झाल्याने युवा वर्ग मोठ्या संख्येने आपल्या बैलांना आकर्षक रंगरंगोटी करून गावातून मिरवणूक काढण्यासाठी सज्ज होते. तर भैरवनाथ मंदिर, मारुती मंदिर, खंडोबा मंदिरात जाऊन प्रत्येक बैल नतमस्तक होत होते.

वर्षभर शेतकरी राजाला साथ देणाऱ्या बैलांना सकाळी लवकर भिमा नदीच्या पात्रात धुवून सजविण्यासाठी बच्चे कंपनीने गर्दी केल्याचे चित्र होते. दुपारी सुरु झालेली बैलांची मिरवणूक रात्री उशिरा पर्यंत निर्विघ्न सुरू होती.





