शिरुर : प्रतिनिधी
शिरुर शहरातील ज्येष्ठ्य वैद्यकीय व्यावसायिक व माजी नगरसेवक डॉ. बी. बी. पाटील ( वय -९२ वर्ष ) यांच्यावर
शिरुर येथील अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यविधी झाला. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ विवाहित मुली, सूना, नातवंडे असा परीवार आहे.
पाटील हे शहरातील प्रसिध्द असे डॉक्टर होते. त्याच्या शहरातील रामआळीत दवाखाना होता. त्याच बरोबर सन १९८५ ते १९९२ या काळावधीत ते शिरुर नगरपरिषदेत नगरसेवक होते. डॉ. अजय पाटील व व्यवसायिक अमर पाटील यांचे ते वडिल होत.

‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीद आयुष्यभर जपणारे आणि सचोटी, प्रामाणिकपणा रुग्णाप्रति जिव्हाळा असणारे माजी नगरसेवक व सर्वसामान्याचे डॉक्टर बी . बी. पाटील हे शहरातील वंदनीय व्यक्तिमत्व हरपले अश्या शब्दांत अनेकांनी डॉ .पाटील यांना आदरांजली अर्पण केली .
माजी आमदार सूर्यकांत पलांडे व माजी आमदार पोपटराव गावडे , जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, शिरुर शहर विकास आघाडीचे शहराध्यक्ष ॲड . सुभाष पवार, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष डॉ. व्ही. एच. पानसरे, जाकिरखान पठाण, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मुजफ्फर कुरेशी, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख, जयवंत साळुंखे, प्रमोद जोशी, प्रकाश बाफना, प्रवीण गायकवाड, विलास आंबेकर, प्रभुलिंग वळसंगे, डॉ . पवन सोनवणे यांनी श्रध्दांजली अर्पण केली .

माजी आमदार पोपटराव गावडे यावेळी श्रध्दांजली वाहताना म्हणाले की डॉ. पाटील यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्राची हानी झाली आहे. ते गरिबांचे डॉक्टर होते. अत्यंत प्रामाणिक व सचोटीने वैद्यकीय सेवा त्यांनी केली .





