- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणस्वच्छता करणे ही आपली जबाबदारी : सरपंच विक्रम गव्हाणे

स्वच्छता करणे ही आपली जबाबदारी : सरपंच विक्रम गव्हाणे

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोरेगांव भिमा ग्रामपंचायत च्या माध्यमातुन ‘१ तारीख १ तास ‘या स्वच्छतेसाठीचा अभियानात एक तास श्रमदान या उपक्रमात ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी सह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी असे शेकडो जणांनी सहभाग घेत गावातील असंख्य ठिकाणी श्रमदानातून संबधित परिसराची स्वच्छता केली.


यावेळी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विक्रम गव्हाणे पाटील, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा गव्हाणे, वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, पोलिस पाटील मालन गव्हाणे, भाजपा चे संपत गव्हाणे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर, सर्व कर्मचारी वर्ग, महिला मंडळ, छत्रपती संभाजी हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक वृंद, जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक वृंद सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


या उपक्रमाच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील ग्रामपंचायत परिसर, मारुती मंदिर, दशक्रिया विधी घाट, दत्तनगर मध्ये संपूर्ण गल्ली आदी ठिकाणी साफसफाई करत स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबविण्यात आले. याला ग्रामस्थांनी देखील सकारात्मक सहभाग दिला असल्याचे ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांनी सांगितले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

तर आपले घर ज्या प्रकारे स्वच्छ ठेवतो तसेच आपल्या व आपल्या प्रिय जनाच्या आरोग्य साठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य असल्याचे यावेळी आपली लोकशाही शी बोलताना सरपंच विक्रम गव्हाणे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page