- Advertisement -spot_img
Homeसामाजिक उपक्रमसरडे वस्ती भाग शाळेसाठी ढगे यांनी दिला वॉटर फिल्टर

सरडे वस्ती भाग शाळेसाठी ढगे यांनी दिला वॉटर फिल्टर

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
सामाजिक भावनेची जान ठेवत हवेली तालुक्यातील पेरणे गावचे युवा उद्योजक दिपक ढगे पाटील यांनी देवांश यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरडे वस्ती येथे साजरा करत विद्यार्थ्यांसाठी शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर फिल्टर देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. या उपक्रमाबद्दल ढगे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


सरडे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक भाग शाळेतील मुलांची पिण्याच्या पाण्याची खूप गैरसोय होत होती ती गरज ओळखून दीपक ढगे पाटील यांनी त्यांचा मुलगा देवांश याच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शाळेसाठी फिल्टर उपलब्ध करून दिला. यामुळे येथील विद्यार्थ्यांचा शुध्द पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.


यावेळी माजी उपसरपंच गणेश येवले, प्रदीप वाळके, हनुमंत सरडे, हरी दादा सरडे, अंगणवाडी सेविका ललिता सरडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक किरण खैरे, रीटा मॅडम उपस्थित होते.

 

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page