गजानन गव्हाणे पाटील
शिरुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून स्मिता काळे यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. यापुर्वीचे मुख्याधिकारी ॲड .प्रसाद बोरकर यांची बदली झाल्याने त्याच्या जागी काळे यांनी सुत्रे स्वीकारली आहेत.

काळे यांनी यापुर्वी नागपूर महानगरपालिकेत सह सावनेर, कळमेश्वर व माळेगाव येथे मुख्याधिकारी म्हणुन काम केलेले आहे. माळेगाव नगरपंचायतीस स्वच्छ्ता अभियानात त्याच्या कार्यकाळात बक्षिस मिळालेले आहे स्वच्छ व हरित शिरुर करण्याचा ही मानस असल्याचे ते म्हणाले.

आपल्या कार्यकाळात स्वच्छता व नागरी सुविधा याला विशेष प्राधान्य देणार असल्याचे काळे यांनी सांगितले .
शहराची पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्या बरोबरच शहर विकासाच्या विविध शासकिय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्याबरोबर शहरात झाडी वाढवण्यासाठी काम करु असे त्या म्हणाल्या. लोकसहभागातुन स्वच्छ व हरित शिरुर करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी त्याच्या समवेत पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अय्युब सय्यद व वरिष्ठ आधिकारी राहुल पिसाळ उपस्थित होते.





