गजानन गव्हाणे पाटील
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान च्या विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वाढीव निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे प्रतिपादन शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रांजणगाव येथे केले. भाद्रपद महोत्सवाचे औचित्य साधून महागणपतीच्या दर्शनास आले असता रांजणगाव गणपती देवस्थान च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.


यावेळी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, कल्पना आढळराव, युवासेने चे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे , विक्रम पाचुंदकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, रविंद्र करंजखिले, दत्ताञय गिलबिले, किशोर टावरे, अमोल बो-हाडे आदी उपस्थित होते.
दरम्यान श्रीं च्या उत्सव मुर्तीची वाजत गाजत मंदिर परिसरात मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीत देवस्थानचे विश्वस्त, कर्मचारी, देऊळवाडा, पुजारी, सेवेकरी, मानकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे रांजणगाव एमआयडीसी पोलीस चे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी मंदिर बंदोबस्ता दरम्यान पोलीस कर्मचारी विलास आंबेकर , दत्ताञय शिंदे, वैजनाथ नागरगोजे यांना साध्या वेशात नेमले होते.


यावेळी विलास आंबेकर यांना मंगळवारी पालखी सोहळ्या दरम्यान दोन महिला संशयितरित्या हालचाल करताना दिसताच त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी मंदिर परिसरात साध्या वेषात राहुन दर्शनास आलेल्या भाविकांचे दागिने चोरणा-या महिलांना अटक करुन त्यांच्या कडील दागिने हस्तगत केले आहेत. संबंधित महिलांना हे दागिणे लवकरच देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.







