- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगांव भीमा व परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

कोरेगांव भीमा व परिसरात गणेशाचे उत्साहात स्वागत

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगांव भीमा व परिसरातील गावांमध्ये आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आगमन झाले. त्यातच अधून मधून येणाऱ्या पावसामुळे गणपती घेण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची थोडी धांदल उड्याल्याचे चित्र पहायला मिळाले.

पलक पटेल यांच्या घरातील आकर्षक गणेशमूर्ती

यंदाचे वर्षी कोरेगाव भीमा येथील बाजापेठेत अनेकांनी गणपती ची दुकाने थाटली होती. तर आकर्षक गणेश मूर्ती घेण्यासाठी पेरणे, डोंगरगाव, पिंपरी सांड्स, वाजेवाडी आदी गावांमधून लोक येत होते. दुपारपर्यंत अनेक ठिकाणी स्टॉल वर गणेश मूर्ती होत्या परंतु दुपार नंतर काही तासात अनेक ठिकाणच्या मूर्ती संपल्याने मिळेल ती गणेश मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांनी पुणे नगर महामार्गावरील दुकानामध्ये गर्दी केल्याचे चित्र होते.

महेश घटमाळ यांच्या घरातील चांद्रयान ३ चा देखावा सोबत आकर्षक गणेशमूर्ती (कोरेगांव भीमा)

त्यातच झेंडूची सुटी फुले, गुलाब तसेच फुलांचे हार घेण्यासाठी नागरिकांनी मागणी वाढल्याने शेतकरी वर्गाला या १० दिवसांसाठी का होईना सुगीचे दिवस आल्याने त्यांनी बाप्पाचे आभार मानले. घरगुती गणपती ची स्थापना अनेकांनी सकाळच्या मुहूर्तावर केली तर कामानिमित्त बाहेर असलेल्या गणेश भक्तांनी दुपार नंतर गणपती ची स्थापना केली. अनेक मंडळांनी यंदा आकर्षक गणेश मूर्ती ची स्थापना करण्याबरोबरच साधेपणाने गणपती बसविले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page