गजानन गव्हाणे पाटील
सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन काही तासांवर येऊन ठेपले असताना गणरायाच्या स्वागतासाठी कोरेगांव भीमातील बाजारपेठा सजल्या असून गणपतीचे स्वागतासाठी आरास, फुले, फळे आदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठा खुलून गेल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव आदी गावातील गणेशभक्त खरेदी साठी येत आहेत. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी बाजारपेठेत आकर्षक फुलांचे डेकोरेशन उपलब्ध असून सोबत विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, रांगोळी, गणरायाच्या गळ्यातील मोत्यांच्या माळा, आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण वातावरण उजलून निघाले आहे. एकीकडे पावसाने पाठ फिरवली असताना देखील गणेशभक्तांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र कोरेगाव भीमा व परिसरात पहायला मिळत आहे.


काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात पेन च्या आकर्षक शाडू मातीच्या गणेशमूर्ती वाहून गेल्याने मूर्ती २५ ते ३५ % टक्के महाग झाल्या असल्याचे मागील १२ वर्षांपासून कोरेगांव भीमात मूर्ती चे स्टॉल लावलेल्या धीरज परदेशी, पियूष परदेशी, मंदार खैरमोडे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.






