निगुडघर प्रतिनिधि : बाबाजी साळेकर
हिरडस मावळातील केंद्र शाळा साळव येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषणमाह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यामध्ये अंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्षीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांर्गत शाळा, केंद्र व तालुकास्तरावर अनेक विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षीच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत त्यांच पार्श्वभुमीवर देशामध्ये सप्टेंबर महिना पोषणमाह म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने शाळा व तालुकास्तरावर पाककृती स्पर्धाचे आयोजन १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात येत आहे. यामध्ये पालक, ग्रामस्थ, शाळेतील स्वयंपाकी, मदतनीस यांना सहभागी होऊन उत्कृष्ट चवदार तृणधान्य पाककृती बनवणात्यांना प्रथम क्रमांकाचे पाच हजार रूपयांचे बक्षीस देण्यात आले.

पोषणमाह योजने अंतर्गत केंद्र शाळा साळव येथे पाककृती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा स्तरावर प्रथम क्रमांक उज्वला सोमनाथ साळेकर, दुसरा माया आंनदा डेरे व तिसरा सुजाता सचिन जंगम याचा तिसरा क्रमांक आला. यावेळी केंद्र प्रमुख पुरंदरे गुरूजी मुख्यध्यापक घाडगे गुरूजी, गायकवाड मँडम, अंगणवाडी सेविका, पालक महिला वर्ग मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.





