- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रदिप कंदानी ताकद लावून गावांसाठी विकासकामे आणली : माजी खासदार आढळराव पाटील

प्रदिप कंदानी ताकद लावून गावांसाठी विकासकामे आणली : माजी खासदार आढळराव पाटील

- Advertisement -spot_img

पूर्व हवेलीत १० कोटी ५० लाख विकासकामांचा शुभारंभ
गजानन गव्हाणे पाटील
गावांना भेट देणे, ग्रामस्थांच्या आडीअडचणी समजून घेणे, आम्ही अनेक दिवसांपासून प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले. तसे पाहिले तर आडीअडचणी न संपणाऱ्या आहे. प्रदिप कंद यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावून गावोगावासाठी विकासकामे आणली. शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व गावात विकासकामे केली. धर्मवीर संभाजी राजे महाराजांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी ४०० कोटींचा निधी मंजूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करून प्रयत्न केला आहे. लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वेळ घेऊन शुभारंभ होणार आहे असे प्रतिपादन शिरूर चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.


ग्रामीण भागात विकासकामाची गती आपल्याला मिळाली. लोकांचे प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. शिवसेना तालुका प्रमुख विपुल सारखा कष्टाळू सहकारी मला भेटला. पहिला कार्यकर्ता माझ्याबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर आला तो विपुल शितोळे आहे. असे मत विविध विकास कामांबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळरावं पाटील यांनी व्यक्त करताना सांगितले.
पूर्व हवेली तालुक्यातील पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, न्हावी सांडस, अष्टापूर, वाडेगाव येथे १० कोटी ५० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांच्या शुभारंभ माजी खासदार शिवाजीराव आढळरावं पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पिडीसीसी बँकेचे संचालक प्रदिप कंद, भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांच्या हस्ते पार पडला.


न्हावी सांडस येथे भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, शिवसेनेचे हवेली तालुकाध्यक्ष विपुल शितोळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश सातव, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, भाजपचे जिल्हा सचिव प्रदिप सातव, सागर शितोळे, माजी सरपंच अंकुश कोतवाल, अष्टापूर येथे पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप तसेच वाडेबोल्हाईत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, माजी उपसरपंच संजय भोरडे, माजी उपसरपंच विद्याधर गावडे, सरपंच दिपक गावडे, माजी सदस्य विजय पायगुडे, चिंटूकाका गावडे, शाळा व्यवस्थापन् समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे शाखाध्यक्ष रवींद्र भोर, माजी उपसरपंच सूरज भोरडे, सोसायटीचे चेअरमन नीलकंठ केसवड, मुख्याध्यापक संदिप गोसावी, ग्रामविकास अधिकारी संतोष भोसले, संध्या भोर, बळीराम गावडे, अशोक इंगळे आदी पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सरकारची कुठलीही योजना माझ्या माणसांपर्यंत पोहोचली पाहिजेत. बीजेपी चे वातावरण चांगले करण्यासाठी संदीप भोंडवे, शामराव गावडे यांनी प्रयत्न केले आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. घरकुल योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारकडून अडीच लाख रुपयाची तर पाण्याची योजना जलमिशन प्रत्येक गावामध्ये कोट्याची योजना चालू झाली आहे. रस्त्यांची योजना, महिलांसाठी योजना, मोदींचे स्वप्न घराघरात नळ बसला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रदिप कंद, संचालक-पिडीसीसी बँक तथा मा.अध्यक्ष-जि.प.पुणे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page