गजानन गव्हाणे पाटील
शिरूर पंचायत समितीचे उपसभापती व सभापती अशी दोन्ही पदे भूषवलेल्या माजी सभापती मोनिका हरगुडे यांची नुकतीच महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून सदर निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्तित पार पडला. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या तेव्हा शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती मोनिका हरगुडे यांनी महिलांचे प्रश्न तसेच महिला संघटन व विविध योजना तसेच विविध उपक्रम या कामाची दखल घेत त्यांची महिला पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, रवींद्र काळे आदी पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्तित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन व बांधणी करणार तसेच पक्षाची ध्येये धोरणे व महिलांच्या प्रश्नांपदी न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे निवडीनंतर हरगुडे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.





