गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे – काकडे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी शिवानी स्वप्नील शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच हेमलता विलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी यांनी काम पाहिले.


विद्यमान उपसरपंच दिपाली वैभव शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. यावेळी शिवानी शिंदे यांचा पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने शिवानी शिंदे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली असल्याचे ग्रामविकास अधिकारी कोळी यांनी जाहीर केले.


यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच हेमलता शिंदे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, युवराज काकडे, उषा काकडे, योगिता शिंदे, उल्का शिंदे, माजी सरपंच विजय शिंदे, रमेश काकडे, भरत काकडे, ऋषिकेश शिंदे, माजी विकास सोसायटीचे चेअरमन व उद्योजक कल्याण आबा शिंदे, चेअरमन नितीन शिंदे, सुनील काकडे, संचालक बाबासाहेब काकडे, युवराज काकडे (वस्ताद), माजी सभापती अनुसया बारणे, विश्वास काकडे, paii सचिन काकडे, पप्पूशेठ शिंदे, नागेश्वर दिंडीचे अध्यक्ष खंडू काकडे, बापूसाहेब वामन काकडे, माजी उपसरपंच विलास नाथू काकडे, हरिभाऊ काकडे, मच्छिंद्र शिंदे, ह.भ.प. गणेश गोविंद शिंदे, वैभव शिंदे, बजरंग शिंदे, शहाजी काकडे, आण्णा शिंदे, रामदास शिंदे, भीमराव शिंदे, राजेंद्र बाजीराव शिंदे, उद्योजक संभाजी राजाराम शिंदे, संजय पठारे, स्वप्नील शिंदे , सचिन रासकर, संजय ज्ञानोबा शिंदे, शिवाजी लक्ष्मण शिंदे, महेंद्र शिंदे, सुशील शिंदे, सन्मान शिंदे, दत्ता शिंदे, अजय शिंदे, अमित शिंदे, निखिल शिंदे, मयूर काकडे (MK), नितीन काकडे, राहुल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

मूलभूत सुविधांचे बरोबरच महिला व मुलींसाठी गावात उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून महिला बचत गटांना देखील व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच शिवानी स्वप्नील शिंदे यांनी “आपली लोकशाही” शी बोलताना सांगितले.





