- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या...

आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक व कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे केंद्रिय कार्याध्यक्ष व संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे, शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.


मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये आमदार अशोक पवार यांचे खंदे समर्थक व कोंढापुरी गावचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील व स्वर्गीय अरुण आबा गायकवाड यांच्याही ऋणानुबंधास उजाळा मिळाला असून दस्तुरखुद्द शरद पवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या सहकारी स्व. अरुण गायकवाड यांच्या मुलाला हे पद मिळाल्याने जुने कार्यकर्ते व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी माजी उपसभापती व रा. प. घो. स. सा. कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, निमोणे गावचे सरपंच श्याम काळे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक संजय काळे, विजय ढमढेरे, विनय गायकवाड, योगेश गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page