गजानन गव्हाणे पाटील
प्रेरणा सोशल फाउंडेशन व प्रेरणा सहकारी बँकेच्या वतीने आकुर्डी निगडी येथील ग. दि. माडगूळ सभागृहात शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील शरद चंद्रजी पवार विद्यालयातील उपक्रम शिल शिक्षक सोमनाथ भंडारे यांना जिल्हा स्तरावरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील ५१ मुख्याध्यापक शिक्षक व दहा उपक्रमशील शाळा यांचा गुणगौरव करण्यात आला.

या प्रसंगी दिशा सोशल फाउंडेशन, शिक्षण तज्ञ यजुर्वेंद्र महाजन, प्रेरणा बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, संस्थापक तुकाराम गुजर तसेच पारखी, व ज्यांच्या सुंदर कल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला ते प्रेरणा बँकेचे संचालक व पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे कार्यक्षम अध्यक्ष नाना शिवले यांच्या उपस्थित संपन्न झाला.

जिल्ह्यातील गुणवंत कृतिशील उपक्रमशील मुख्याध्यापक शिक्षकांचा व शाळांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. यावेळी बँकेचे चेअरमन यांनी शिक्षकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत व कमी व्याज दराने कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहेत याची घोषणा करण्यात आली. तसेच शिक्षण तज्ञ महाजन यांनी शिक्षकांची कर्तव्य व राष्ट्रनिर्माणासाठी आपण काय केले पाहिजे याच्या काही महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या.





