गजानन गव्हाणे पाटील
निवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब दौंडकर यांची नुकतीच चिंचोशी, ता. खेड येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीत संचालक पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सुभद्रा बगाटे यांनी काम पाहिले तर सचिव मारूती शिंदे यांनी या निवणुकीसाठी सहकार्य केले.

यावेळी अक्षय खैरे, चिंचोशी च्या सरपंच उज्वला गोकुळे, चेअरमन देवानंद निकम, तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ घोडके, संचालक दत्तात्रय दरगुडे, सुनिता दरगुडे, मंगेश निकम, पांडुरंग निकम, बाजीराव गोकुळे, बाबाजी घोडके, सविता गोकुळे, शिवाजी जाधव, दुधनाथ गंगावणे, माजी सरपंच बजरंग आण्णा दरगुडे, प्रकाश गोकुळे, सुरेश निकम, संभाजी माळी, रामभाऊ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर बाळासाहेब दौंडकर यांचा सोसायटी संचालक व चिंचोशी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.





