- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे आयोजीत श्रीराम चौकातील धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी...

शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे आयोजीत श्रीराम चौकातील धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव जल्लोषात संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
श्रीराम चौकात लवकरच प्रभू श्रीरामांची प्रतिमेची स्थापना होणार असून प्रभाग २६ मधील हिंदू बांधवांचे स्वप्न साकार होणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे यांनी दहीहंडी उत्सवात प्रसार माध्यमांशी बोलताना केले.


नाना भानगिरे यांनी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने श्रीराम चौकात आयोजित केलेला धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात हजारो गोपाळभक्तांच्या उपस्थितीत यंदा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.


माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाप्रमुख उल्हासभाऊ तुपे, रमेशबापू कोंडे पाटील, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, मनपा उपायुक्त प्रसाद काटकर, ढाकणे सर, बाळासाहेब तात्या भानगिरे, मा. शरद मोहोळ, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे पाटील, विजयाताई वाडकर, योगेश ससाणे, उपशहरप्रमुख संतोष रजपूत, विकी माने, काका पवार, योगेश जोशी, विभागप्रमुख अभिमन्यू भानगिरे, सचिन तरवडे, संतोष जाधव, विश्वास पोळ, अमर घुले, विकास भुजबळ, कपिल काळे, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, सागरराजे भोसले, राजुशेठ ढेबे, नाना भिसे, रवींद्र भानगिरे, माउली भानगिरे, संतोष भानगिरे, गणेश बोराटे, बबन आंधळे, ज्योस्ना सातव, सारिका पवार, अयोध्या आंधळे, विकास शेवाळे, गोरख पांचाळ आणि प्रचंड मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
मुंबईहुन आलेल्या क्रेझी ईगल गोविंदा पथकाने धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी फोडण्याचा यावेळी मान पटकावला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page