रांजणगाव गणपती : प्रतिनिधी
रांजणगाव गणपती, ता. शिरूर येथील दयानंद निळोबा फाऊंडेशन संचालित उज्वल इंटरनॅशनल स्कूल आणि दयानंद विद्यामंदिर रांजणगाव विद्यालयात गोपाळकाला कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्रमुख उर्मिला खेडकर उपस्थित होत्या. यावेळी विनिता चौधरी, किरण शेळके, संध्या चव्हाण, भास्कर शिंदे व सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा आणि कृष्णाचा पाळणा तसेच दहीहंडीसाठी विद्यार्थ्यांनी केलेला मनोरा यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली.
दहीहंडीच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






