- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणआला रे आला गोविंदा आला च्या निनादात बाल गोपाळांनी फोडली सनराईजची दहीहंडी

आला रे आला गोविंदा आला च्या निनादात बाल गोपाळांनी फोडली सनराईजची दहीहंडी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
गोविंदा रे गोपाला च्या निनादात संगीताच्या तालावर व पावसाच्या सरींवर स्वार होत कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील मुले राधा कृष्णाच्या वेशभूषेत आली असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांनी दिली.


विद्यालयात अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येतात. आजच्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी डोळ्यांवर पट्टी बांधून हंडी फोडणे आदी खेळ व भर पावसात विद्यार्थ्यांनी केलेले नृत्य वाखाणण्याजोगे होते. तर थर लाऊन हंडी फोडताना इतर विद्यार्थ्यांनी बाळ गोपालांना टाळ्या वाजवत प्रोत्साहन दिले. त्यात आज दिवसभर पावसाने हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.


दहीहंडीच्या कार्यक्रमाचे नियोजन व संपूर्ण व्यवस्थापन भारती शिंदे, बेबी झावरे, शिल्पा मेस्तरी, निर्मला मुरकुटे, गीता ढगे, स्वप्नाली घावटे, शीतल ताठे, रोहिणी शिंदे, वंदनाकुमारी, अश्विनी उन्हाळे, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया गव्हाणे, मिलिंद गायकवाड, सुवर्णा देशपांडे, तनुश्री नायक, कल्याणी गायकवाड, सुप्रिया कुंभार, संजय पेंटूले, आशा शिवले यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page