गजानन गव्हाणे पाटील
वढु खुर्द, ता. हवेली येथील अंगणवाडीत दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडीतील मुले व मुली श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत आली होती.

यावेळी सरपंच रसिका चोंधे, माजी सरपंच मोहिनी भोंडवे, सदस्य सीमा भंडलकर, वंदना दरेकर, कोमल धुळे, पालक प्राजक्ता लंगडे, आश्विनी दौंडकर, दिपाली कातोरे, दिव्या भाले, प्रियंका पवळे, अंगणवाडी सेविका आशा पांतोंड मदतनीस नंदिनी निळेकर व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

अंगणवाडीतील मुलांना आपली संस्कृती समजावी यासाठी शालेय शिक्षणाचे बरोबर विविध सण, उत्सव साजरे करण्यात येत असल्याचे अंगणवाडी सेविका आशा पातोंड यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले.





