गजानन गव्हाणे पाटील
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

यावेळी समितीचे कार्य सांगत समिती अध्यक्ष अर्चनाताई म्हाळस्कर थिटे आणि उपस्थितांनी संवाद साधला. तसेच समितीचे कार्य पुस्तिका अहवाल त्यांना भेट देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र काका कुऱ्हाडे पाटील, अर्जुन मेदनकर, अदेश परिहार, रंजनाताई पराड, मनिषा यादव आदी मान्यवर उपस्थित होते.





