गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील दामोदर नगर मध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव शिवशंभू प्रतिष्ठाणच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य नागरिक व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तर श्रीकृष्णा च्या पाळण्याला फुलांची सजावट करण्यात आले होते.

शिवशंभू प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन मागील चार वर्षांपासून विविध उत्सव साजरे करण्यात येतात. सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी, मकरसंक्रांत, दिवाळी पाडवा, विजयादशमी आदी सण एकोप्याने साजरे सर्व नागरिक एकत्र येत करत असतात






