- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणछावा ग्रुप च्या माध्यमातून केसनंद येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन

छावा ग्रुप च्या माध्यमातून केसनंद येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील केसनंद येथे छावा ग्रुप आयोजित अखिल केसनंद गाव दहीहंडी उत्सव २०२३ मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे छावा ग्रुप चे संस्थापक व केसनंद गावचे विद्यमान सरपंच दत्ता (आबा) हरगुडे व ग्रुप चे अध्यक्ष संदीप ढोरे यांनी आपली लोकशाही शी बोलताना सांगितले. सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे हे १२ वे वर्ष असून नागरिकांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन छावा ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.
८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उत्सवाचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री फुलपाखरू फेम ऋता दुर्गुळे उपस्थित राहणार आहे. तर मनोरंजना साठी संध्या पाटील ऑर्केस्ट्रा असणार असल्याचे उत्सव कमिटीचे अध्यक्ष दिनेश हरगुडे व उपाध्यक्ष विक्रम हरगुडे यांनी सांगितले.


यंदाच्या वर्षी पाऊस काही प्रमाणात कमी पडला असला तरी देखील ग्रुप च्या सहकार्याने बाबा महाराज टेकडी वर १० हजार झाडे लावण्यात येणार असून त्याचे संगोपन व व्यवस्थापन छावा ग्रुप करणार आहे. तरी प्रत्येक ग्रामस्थांने किमान दोन तरी झाडे लावावीत असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गावातील गरजू व हुशार विद्यार्थ्यांना छावा ग्रुप च्या माध्यमातून शैक्षणिक सहकार्य करण्यात येणार आहे.


केसनंद गावा मधील मानाच्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन व व्यवस्थापन छावा ग्रुप चे संस्थापक विद्यमान सरपंच दत्ताआबा हरगुडे व अध्यक्ष संदिपआप्पा ढोरे यांच्या मार्गदर्शना खाली दहीहंडी उत्सव कमीटीचे सचिनआप्पा हरगुडे, उमेश मोरे , विशाल हरगुडे, अॅड अनिल हरगुडे, निखिल ढोरे, स्वप्नील सातव, सागर हरगुडे , गणेश गावडे, आजित कांचन, गणेश कांचन, स्वप्लीन बांगर, भरत वाबळे व इतर संचालक मंडळ करणार आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page