गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरुर येथील ज्ञानांकुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सनराईज इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, कोरेगांव भीमा विकास सोसायटीचे चेअरमन नागेश गव्हाणे पाटील, सोसायटीचे सचिव मधुकर कंद, माजी उपसरपंच अरविंद गव्हाणे, उद्योजक नितीन काशीद, शहाजी फडतरे, पिंपरी दुमाला तंटामुक्ती चे अध्यक्ष अमोल चिखले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली तर मुख्याध्यापक म्हणून आजच्या दिवसाचे काम यश फरताळे या विद्यार्थ्यांने पाहिले. शिक्षक दिनाचे निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर संगीत खुर्ची, डान्स आदी उपक्रम यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात राबविण्यात आले.

नियोजन व व्यवस्थापन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे – घुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, बेबी झावरे, शिल्पा मेस्तरी, निर्मला मुरकुटे, गीता ढगे, स्वप्नाली घावटे, शीतल ताठे, रोहिणी शिंदे, वंदनाकुमारी, अश्विनी उन्हाळे, मनीषा वाघमारे, संगीता पारखे, सुप्रिया गव्हाणे, मिलिंद गायकवाड, सुवर्णा देशपांडे, तनुश्री नायक, सुप्रिया कुंभार, संजय पेंटूले, आशा शिवले यांनी केले.





