- Advertisement -spot_img
Homeक्राईमतळेगाव ढमढेरे - न्हावरा रस्तावर भरधाव वेगात झालेल्या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

तळेगाव ढमढेरे – न्हावरा रस्तावर भरधाव वेगात झालेल्या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे – न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावर तोडकर वस्ती येथे पिकप (टेम्पो) आणि कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले आहेत तर दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला.
रविवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव पिकपने (एम. एच. १६, सी.डी. ४७४२) व कारला (एम. एच. १२, एस. यु. ५६५९) धडक दिल्याने भीषण अपघात झाला. सर्व जखमींना शिक्रापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता त्यातील तिघेजण मृत्यू पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यामध्ये कार मधील अनिता राजू बोरुडे (वय ४० वर्षे), योगिता सुनील बोरुडे (वय ४० वर्षे) व राजू अशोक शिंदे (वय २५ वर्षे, सर्वजण मूळ राहणार कात्राबाज मांडवगण, ता. श्रीगोंदा) या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर किशोरी सुनील बोरुडे (वय १७ वर्षे ) ही जखमी झाली आहे. तसेच पिकप मधील चालक श्रीराम बापू मांडे व धीरज कांतीलाल लोखंडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) हे जखमी झाले आहेत.
जखमींवर शिक्रापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. पिकप चालक श्रीराम बापू मांडे (रा. बेलवंडी कोठार, ता. श्रीगोंदा) यांचे विरुद्ध अविनाश निवृत्ती बोरुडे यांनी रात्री उशिरा शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page