- Advertisement -spot_img
Homeक्राईमआंध्रप्रदेश येथून कर्जतला जाणारा ५२० किलो गांजा पोलिसांनी लोणीकंद येथे पकडला

आंध्रप्रदेश येथून कर्जतला जाणारा ५२० किलो गांजा पोलिसांनी लोणीकंद येथे पकडला

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पोलिसांना व कोणालाही संशय येऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाची पाटी लावून २ चारचाकीत गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अंमली पदार्थ विरोधी पथक २ या पथकाने ताब्यात घेऊन तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांचा गांजा हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील अर्मासेल कंपनी समोर हस्तगत केला आहे.
तब्बल ५२० किलो गांजा आंध्रप्रदेश येथून कर्जत येथे नेण्यात येणार होता. पोलिसांनी गाडीची झडती घेऊ नये तसेच संशय येऊ नये म्हणून त्यांनी एका महिलेला पैसे देण्याचे आमिष दाखवून गाडीत बसवले होते. त्यांच्या ताब्यातून स्कॉर्पिओ, सेलेरिओ कार, मोबाईल असा १५ लाख ७१ हजाराचा इतर ऐवजही जप्त करण्यात आला आहे.
संदिप बालाजी सोनटक्के (वय २९, रा. खालापूर, रायगड), निर्मला कोटेश्वरी मूर्ती जुन्नुरी (वय ३६, रा. गंटूर, आंध्र प्रदेश) आणि महेश तुळशीराम परीट (वय २९, रा. खालापूर, रायगड) यांना अटक करण्यात आली आहे. तिघांवर एनडीपीसी ॲक्ट अंतर्गत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

ही कार्यवाही पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक शुभांगी नरके, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे, सचिन माळवे, दिनेश बास्टेवाड तसेच सिंहगड पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार अविनाश कोंडे, ऋषिकेश महाल्ले, सलिम तांबोळी, किरण बरडे यांनी केली आहे.
गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक शुभांगी नरके करत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page