गजानन गव्हाणे पाटील
गरोदर माता, लहान मुले यांना कशा प्रकारे आपल्या जेवणात आहार घ्यावा की ज्याचा फायदा त्यांना व लहान मुलांना होईल यासाठी बीट – वढु 1, प्रकल्प – शिरूर 2 यांच्या तर्फे पोषण माह सप्ताहाचा शुभारंभ नुकताच वढू पुनर्वसन येथे करण्यात आला.
पर्यवेक्षिका माणिक देडगे यांनी महिला आणि पालक यांना पोषण आहार विषयी मार्गदर्शन केले. तर प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे आणि बेंगाळ मॅडम यांनी कार्यक्रम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात संघटना प्रतिनिधी अर्चना मिडगुले, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहभाग घेतला.

पोषण अभियान संपूर्ण सप्टेंबर महिना प्रत्येक अंगणवाडी मध्ये राबविण्यात येणार आहे. पालकांमध्ये पोषण आहार विषयी जनजागृती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोषण आहार व पोषण गुढी यांचे प्रदर्शन आयोजित केले होते तसेच सर्वांनी मिळून पोषण अभियान प्रतिज्ञा घेतली.
या अभियानात एकूण २३ सेविका २२ मदतनीस आणि पालक यांनी सहभाग नोदविला. यामध्ये सणसवाडी ६, कोरेगाव भीमा ७, डिंग्रजवाडी २, वढू बुद्रुक ६, आपटी १ , वाजेवाडी १ अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.





