गजानन गव्हाणे पाटील
अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे कोरेगाव भीमा व परिसरातील गावांमध्ये सकाळी सकाळी मुसळधार आगमन झाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले तर शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी व कामगारांचे मात्र अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.
अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गाला दुबार पेरणी चे संकट उभे राहिले होते. तर अनेक पिके पावसा अभावी सुकू लागली होती. काल दिवसभर वातावरणात प्रचंड गर्मी झाल्याने अनेकांना ऐन पावसाळ्यात पुन्हा उन्हाळा सुरू झाला असल्याचे वाटले. मात्र सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाच्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना समाधान मिळाले आहे.





